कॅलिफोर्निया
कॅलिफोर्निया : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी पॅसिफिक विभागातील एक राज्य. ३२० ३०' उ. ते ४२० उ. व ११४० ८' प. ते १२४० २४' प.; क्षेत्रफळ ४,१२,६०२ चौ. किमी.; लोकसंख्या १,९९,५३,१३४ (१९७०). याच्या दक्षिणेस मेक्सिको देश, पश्चिमेस पॅसिफिक महासागर, उत्तरेस ऑरेगन आणि पूर्वेस नेव्हाडा व अॅरिझोना ही राज्ये आहेत.